
गोंदिया,दि.01 : चार्जिंगसाठी ठेवलेले मोबाइल चोरी करणार्या टोळीतील तीन महिलांना गोंदिया शहर पोलिसांनी 29 जानेवारीला अटक करीत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.या महिलांकडून चोरलेले मोबाईल जमिनित गढ्डे करुन लपविण्यात आले होते,ते सुध्दा हस्तगत करण्यात आले असून या महिला छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यातील असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी पत्रपरिषदेत दिली.तसेच चोरीला गेलेले दागिने न्यायालयाच्या आदेशाने रामनगर हद्दीतील फिर्यादीला परत करण्यात आले.
गोंदियाच्या मामा चौकातील रहिवासी मोहसीन सेफी शेख (32) यांचा 10 हजार व 7 हजार रुपये किंमतीचा मोबाइल घरून चोरी झाला होता. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू होता. गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी रेल्वे स्थानकाजवळील खुल्या जागेवर संशयास्पद स्थितीत बसलेल्या महिलांची चौकशी केली. त्या महिलांकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तिन्ही महिला छातीसगडच्या डोंगरगड येथील रहिवासी आहेत. मोबाइल चोरीचे चार गुन्हे गोंदिया शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
पोलीस निरीक्षक महेश बंसोडे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक विजय राणे व पोलीस कर्मचार्यांनी रेल्वे स्थानक परिसरात आरोपींनी खड्डे खोडून लपविलेले 25 मोबाइल जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मोबाइलचो किंमत 2.32 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. महिलांना अटक केल्यावर न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश बंसोडे, सहायक पोलीस निरीक्षक विजय राणे, योगेश बिसेन, ओमेश्वर मेश्राम, सतीष शेंड, प्रमोद चव्हाण, विकास वेदक, विजय मानकर यांनी केली.
![]() |
2 वर्षांपूर्वी चोरी झालेले 8 लाखांचे दागिने परत
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या रेलटोली येथील रहिवासी भाविनी निखिल रूपारेल (वय 40) यांच्या घरून 22 ऑगस्ट 2018 रोजी चोरी झालेले 7 लाख रुपये किंमतीचे दागिने (आजच्या बाजार भावानुसार 8 लाख) पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या हस्ते परत देण्यात आले आहे. हे दागिने चोरी गेल्यानंतर पोलिसांनी 23 ऑगस्ट रोजी भादंविच्या कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणात आरोपी बबन सुरेश बागडकर (वय 21) रा. मरारटोली याला अटक करण्यात आली होती. त्याच्याजवळून 278.60 ग्राम वजनाचे दागिने (किंमत 8.20 लाख रुपये) जप्त केले. पोलीस अधीक्षक पानसरे यांनी भाविनी रूपारेल यांना दागिने परत केले





