33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ आपल्या समस्यांविषयी हितगुज साधण्यासाठी महिलांनी एकत्रित यावे : सीमाताई कोरोटे

आपल्या समस्यांविषयी हितगुज साधण्यासाठी महिलांनी एकत्रित यावे : सीमाताई कोरोटे

0
30

blank

चिचगड(सुभाष सोनवणे)ः-दहा टक्के राजकारण व नव्वद टक्के समाज कारण करने, हे आ.सहषराम कोरोटे यांची संकल्पना आहे. ते आमदार झाल्यावर सर्व जाती धर्मातील लोकांचे हित समजून त्याचे समस्याचे निराकरण करुण त्यांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर आहेत. या करिता क्षेत्रातील लोकांचे अडीअडचणी समझने गरजेचे आहे. परिसरातील लोक आमदार साहेबांच्या संर्पकात येवू शकतात. परंतु गृहकार्य करणार्‍या महिला ह्या संपकार्पासुन वंचित राहतात. या करिता महिलांनी आपसातील मतभेद विसरून आपल्या समस्या विषयी हितगुज साधन्यासाठी अशा कार्यक्रमात एकत्रित यावे असे प्रतिपादन सीमाताई सहषराम कोरोटे यांनी केले.
देवरी तालुका महिला काँग्रेसच्या वतीने मकर संक्रांति निमित्य महिलांकरिता सामूहिक हळदी- कुंकू व महिला मेळाव्याचे यशस्वी आयोजन रविवार चिचगड येथील वीर बिरसा मुंडा यांच्या स्मारका जवळ करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांनी बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे उद््घाटन कार्यक्रमाचे संयोजिका सीमाताई कोरोटे यांच्या हस्ते आणि जि.प.च्या माजी अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या अध्यक्षतेखली व दिप प्रज्वलन महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उषाताई शहारे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी देवरी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया, माजी जि.प. सदस्य माधुरिताई कुंभरे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष छबुताई ऊके, चिचगडचे सरपंच कल्पनाताई गोस्वाम, माजी सरपंच अर्चनाताई नरवरे, किरणताई राऊत, पूजाताई कटकवार, पिपरखारीचे सरपंच धनश्रीबाई गंगासागर, वांढराचे सरपंच मीराबाई कुंजाम, उपसरपंच प्रमिलाताई गावळ, माजी सरपंच आनंद अत्तरगडे., गडेगावचे सरपंच कविताताई वलदे, सरपंच लीलाबाई मूंदी, फुलवंताबाई बगडे.रिया, देवरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सुभद्राताई अगडे, कलाबाई सरोटे, पिंड.केपारचे सरपंच प्रमिलाबाई घासले, माजी सरपंच जसवंताताई भारद्वाज, सामाजिक कर्तकर्ता निशा परिहार यांच्या सह चिचगड क्षेत्रातील शेकड.ो महिला वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितीत महिलांना संदीप भाटिया, छबुताई ऊके,  माजी जि.प.अध्यक्ष उषाताई शहारे, उषाताई मेंढे व सीमाताई कोरोटे यांनी अमूल्य मार्गदर्शन केले. दरम्यान महिला काँग्रेसतर्पेष्ठ उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून वानचे वाटप केले. सोबतच महिलांसाठी संगीत खुर्ची व उखाने म्हणणे स्पर्धा घेण्यात आले. या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन चिचगडच्या ग्रा.पं.सदस्य अश्मिताताई राऊत यांनी तर उपस्थितांचे आभार महिला काँग्रेस अध्यक्ष सुभद्राताई अगडे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता चिचगड च्या ग्रा. पं.सदस्य शाईनताई सैय्यद, सीमाताई राऊत, सुनीता नंदागवळी, राधिकाताई धरमगुळे, वत्सलाबाई लटये, निताताई कोल्हारे, नसीमा शेख, किरणताई राऊत, प्रीति सलामे, सुमनताई सलामे, लक्ष्मीताई धानगाये, पूजा कोल्हारे, शोभाताई तोमर, अश्मिता धानगाये, ममता कोल्हारे यांच्या सह देवरी व चिचगड क्षेत्रातील महिला काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

blank