38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गडचिरोलीत ओबीसींचा 22 फेबुवारीला एल्गार,सरकारचे वेधणार लक्ष

गडचिरोलीत ओबीसींचा 22 फेबुवारीला एल्गार,सरकारचे वेधणार लक्ष

0
53

blank

गडचिरोली,दि.02ः– ओबीसी समाजाच्या ज्वलंत मागण्या व समस्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 22 फेबुवारीला गडचिरोली येथे जिल्हास्तरीय मोर्चा आयोजित करण्याचा निर्णय 1 फेब्रुवारीला झालेल्या विविध ओबीसी समाज संघटनेच्या बैठकीक घेण्यात आला.
ओबीसी समाज संघटनेच्या बैठकीत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी,ओबीसी आरक्षणात मराठा समाजासह इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये.महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर, जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पुर्ववत करणे,एससी एसटी समाजप्रमाणे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमासाठी 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी या प्रमुख मागण्यासह इतर मागण्या वर चर्चा करणे,ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करून देणे, इतर विषयावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला रमाकांत ठेंगरी,सुरेश भांडेकर,दहेलकर पाटील,अजय कंकडलावार, रमेश भाऊ बारसागडे, प्रा. चिकटे सर, प्रा. मशाखेत्री सर, महेंद्र ब्राम्हणवाडे, शेषराव येलेकर, भास्कर बुरे, पंकज खोबे, रुचित वांढरे,अनिल कोठारे, प्रशांत वाघरे, सतीश विधाते, बोरकर, चापले, दादाजी चुधरी, रमेश भुरसे, रामचंद्र वासेकर, मारोती दुधबावरे, पांडुरंग भांडेकर, दत्तात्रय खरवडे, राजेंद्र उरकुडे, प्रा. कामडी, विठ्ठलराव कोठारे राजाराम करकाडे, नंदू नाकतोडे, पंकज धोटे, गोपाल घोगडे, जितेंद्र मुंघाटे, सुरेश भांडेकर, अजय लोंढे, धनपाल मीसाट , विलास चूधरी, सचिन गोंगाल, रमेश चौधरी, रामेश्वर खोब्रागडे, प्रशांत बनकर, मनोज निंबारते, नरेंद्र भरडकर, भाऊराव पोरटे, संतोष गझलपल्लीवार, नेताजी बारसागडे, शामराव वाढइ, मनोज पोरटे, किशोर ठाकरे, विनायक बंदूरकर, पांडुरंग घोटेकर, विनायक झरकर, शंकरराव सलोटकर, शंकर पारधी, दामोधर सिंगाडे, ज्ञानदेवजी पिलारे, धनपाल मिसार, लोकमान्य बरडे, बुल्ले, लोमेश राऊत, किरण कारेकर, देवरावजी मोहूर्ले, योगेश सोनूले, पुरुषोत्तम लेंगुरे, प्रभाकरजी कोटरंगे, केशव निंबोड, हरिदास कोटरंगे, शंकर चौधरी, महादेव वाघे, धनराज चुधरी, मंगेश चुधरी, मंगेश भोयर, योगेश नैताम, प्रशांत किरमे, संजय लोणारे, पुरुषोत्तम ठाकरे, सुधीर झुंजाळ, संजय घोटेकर, रोशन भोयर अक्षय जककुनवार, बंडू सातपुते, पालाश भोयर, प्रवीण ठेंगरी, चेतन भोयर, वामन कीनेकर, सदाशिव वाघरे, राहुल मुनघाटे, विलास मस्के, मुक्तेश्वर काटवे, रमाकांत ठेंगरे, गणेश मूलकलवार, राजेंद्र आडे, संतोष मोहूर्ले, सुखदेव जेंघटे, रत्नदीप मशाखेत्री, प्रमोद भगत, देवराव चावळे, सुनील पारधी, भास्कर नरुळे, जितेंद्र ठाकरे, चंद्रकांत शिवणकर, धनंजय हिवसे, आशिष ब्राम्हणवाडे, आशिष मशाखेत्री, नरेंद सलोटकर, विक्की मस्के, संतोष ठाकरे, हितेंद्र तुपट, अरुण दुपारे, निलेश तित्तीरमारे, कमलेश बोरकर गिरीधर मुंडले, राजू बुल्ले, संदीप शेंडे, सागर वाढइ चैतनदास विधाते, हरिदास खरकडे, रामेश्वर डोनाडकर, संदीप वाघाडे, हिरालाल शेंडे, नितीन राऊत, सागर वाढइ निलेश तित्तीरमारे गौरव येणप्रेदिवार आदी बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते.

blank