
साखरीटोला,दि.02- एकात्मिक बाल विकास प्रकल्प जिल्हा परिषद गोंदियाच्या माध्यमातून मंजूर ग्राम पंचायत कोटरा तालुका सालेकसा येथील आंगनवाड़ी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन कोटरा ग्राम पंचायतच्या भावी सरपंच श्रीमती सिमाबाई अशोक कोटiगले यांच्या हस्ते 31 जानेवारी रोजी हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती होत्या. यावेळी शिलाबाई भूते, डिलेश्वरी वरखडे, मुकेश मड़ावी, नरेंद्र दोनोडे, वर्षाबाई भोयर,पुस्तकला भोयर, अनिता चुटे, यादवकांत हत्तीमारे, एकनाथ हत्तीमारे,पो.पा.सिद्धार्थ वासनिक, नरेश कोरे, मोरेश्वर हत्तीमारे, वामन वासनिक, राजू बोरकर, उपस्थित होते. उलेखनीय असे की ग्राम पंचायत कोटरा येथे नुकतेच निवडणूक कार्यक्रम पार पडले यात सरपंच पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण निघाल्यामुळे श्रीमती सिमाबाई अशोक कोटiगले या अनुसूचित जातीच्या एकमेव ग्रा.प.सदस्या आहेत त्यामुळे त्याचे सरपंच बनने निश्चितच झाले आहे म्हणून त्यांना भावी सरपंच असे संबोधन्यात आले.





