36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता अवैध दारू विक्री व्यवसायीकांवर छापेमारी

अवैध दारू विक्री व्यवसायीकांवर छापेमारी

0
88

blank

तिरोडा,दि.03ः- तालुक्यातील दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या विविध गावपरिसरात पोलिसांनी छापे मारून तब्बल 8 लाख 3 हजार 180 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवार, 1 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.रतनारा येथील गजानन बिजेवार याच्या घरी धाड घालून 2 हजार 100 रुपये किंमतीची 2 डबकीत 21 लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.

पिपरिया येथील तुकडूदास हिरामन बागडे (50) याच्या घरी धाड घालून 2 हजार 200 रुपये किंमतीची 2 डबकीत 22 लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. लोधीटोला येथील सुंदरबाई हरीदास चन्ने (45) हिच्या घरून 1 हजार 300 रुपये किंमतीचे प्रत्येकी 180 मिलीने भरलेले 23 नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. पिपरिया येथील बाळकृष्ण रामू मेश्राम याच्या घरी धाड घालून एका प्लास्टीक डबकीत 1 हजार रुपये किंमतीची 10 लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.

दवनीवाडा येथील सोहन रुदन बागडे (50) याच्या घरी धाड घालून दोन प्लास्टीक डबकीत 1500 रुपये किंमतीची 15 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. अशी एकूण 8 हजार 180 रुपये किंमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली. तसेच यारा रंगलाल पारधी (वय 22) व रजनीकांत कुवरलाल सोनवाने (वय 28) दोन्ही रा. सेजगाव यांच्याकडून 1 ब्रास रेती व ट्रॅक्टर-ट्राली असा एकूण 6 लाख 4 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. बोंडरानी शिवारात वैनगंगा नदीपात्रात 1 लाख 91 हजार रुपये किंमतीचा 3040 किलो सडवा मोहफुल बेवारस स्थितीत आढळला. असा एकूण 8 लाख 3 हजार 180 रुपये किंमतीचा माल पोलिसांनी जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई तिरोड्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक निलेश उरकुडे, पोलिस हवालदार प्रताप पटले, खंडाते, कानेकर, भुरे, पारधी, पिपरेवार, तूरकर, चव्हाण, पोलिस शिपाई डोहरे, टेंभेकर यांनी केली.

blank