
गोंदिया,दि.03ः- ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या उद्घाटकीय कार्यक्रमानंतर झालेल्या बैठकीत गोंदिया जिल्हा ज्येष्ठ नागरिक समितीची जिल्हा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.०२ फेब्रुवारीला ज्येष्ठ नागरीक जिल्हा शाखा कक्षाचे उद्घाटन सेवानिवृत्त समाजकल्याण उपायुक्त अनिल देशमुख यांचे शुभ हस्ते पार पडले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दुलिचंद बुध्दे होते.महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे यांच्यासह सेवानिवृत्त बीडीओ नारायणप्रसाद जमईवार, सेवानिवृत्त बँकव्यवस्थापक मधू बन्सोड,अनिल देशमुख,दुलिचंद बुध्दे,बि.एन.पडोळे,अशोक रामटेके,प्रभुदास पालांदुरकर,श्री डीब्बे पोष्टमास्तर,शिवेद्र येळे,विजय बोपचें,व्ही.एस.खोडे, व्ही.बी.भोपे,श्री बालपांडे,श्री गोंडाने आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हा कार्यकारीणीची निवड करण्यात आली,त्यामध्ये अध्यक्ष से.नि.बीडीओ नारायणप्रसाद जमईवार, से.नि.उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे,से.नि.विस्तार अधिकारी बी.एम.पडोळे, से.नि.पोष्टमास्टर बी.डी.डीब्बे, सचिव मधु बंसोड,सहसचिव अशोक रामटेके, संयोजक शिवेन्द्रकुमार येडे,दुलीचंद बुधे,ज्येष्ठ सल्लागार अनिल देशमुख,अश्विन ठक्करसे.नि.ACF,यु.टी.बिसेन से.नि.DFO,इंजि.डी.यु.रहांगडाले तर सदस्यामध्ये सि.वी.गोंडाणे,व्ही.व्ही.बोपचे,प्रभुदास पालांदुरकर,लिलाधर पाथोडे,सुधाकर ढोमणे,युवराज कुंभलकर,आर.कपूर,विठ्ठलराव भरणे,प्रा.माणिक गेडाम,दुर्गाप्रसाद गोरे,आर.झेड.बालपांडे व डॉ.सी.आर.टेंभुर्णीकर यांचा समावेश आहे.





