
जळगाव,दि.04ः जिल्ह्यातील पाचोरा येथे आज गुरुवारला सकाळी 5 ते 5.30 वाजेच्यासुमारास मार्निंगवाँकला गेलेल्या दोन महिलांचा इनोव्हा गाडीच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे. महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली. सामनेर ता. पाचोरा येथील महिला नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सामनेर ते लासगाव दरम्यान जातात,त्याचप्रमाणे आज सुध्दा गेल्या असतांना ही घटना घडली.मनिषा साहेबराव पाटील (वय – 50), अनिता शहादु पाटील (वय 48) ही मृत महिलांची नावे आहेत.
अपघात एवढा जोरदार होता की, एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर दुसऱ्या महिलेला कारने 50 मीटर फरफटत नेले. दोघी महिलांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी दाखल करण्यात आले. असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले.घटनास्थळी पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे ,पोलीस हवालदार रामदास चौधरी, पुढील तपास करीत आहे





