
लाखांदूर/लाखनी – तालुक्यातील मचारना आणि लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे दोन शेतकर्यांनी आत्महत्या केली.
लाखनी तालुक्यातील मचारना येथे शेतात विषारी कीटकनाशक प्राशन करून नलिंद्र र्शावण बडोले (४७) या शेतकर्याने शुक्र वारी आत्महत्या केली. त्यांच्यावर खाजगी आणि बँकेचे कर्ज असल्याचे बोलले जात आहे. आत्महत्याग्रस्त बडोले यांच्याकडे एक एकर शेती असून ती कोरडवाहू आहे. कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. ठाणेदार मनोज सिडाम, पाटील लोमेश कातोरे, पोलिस अंमलदार प्रकाश तलमले, पोलिस शिपाई नावीध पठाण घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. प्रेत उत्तरिय तपासणीकरिता पाठविण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील शेतकर्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील विहिरीत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. प्रल्हाद गणपत गोठे (वय ४३) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. गोठे यांच्याकडे पावणेदोन एकर शेती आहे. नापिकीमुळे त्यांच्यावर कर्ज असल्याची माहिती आहे. प्रल्हाद गोठे बुधवारी रात्री घरून बाहेर पडले. घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध केली. शेतावर मोटर पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या व्यक्तिला त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.




