
यवतमाळ,दि.06,- घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाèया कापसी येथे पोलिओ म्हणून सॅनिटायझर पाजल्या प्रकरणात दोन वैद्यकीय अधिकाèयांना गुरुवार, ४ फेब्रुवारी रोजी निलंबित करण्यात आले. डॉ. भूषण मसराम, डॉ. महेश मनवर, असे निलंबित वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत. घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसी येथील बारा बालकांना पोलिओ डोज म्हणून जंतुनाशक (सॅनिटायझर) पाजल्याची धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणात सीएचओ डॉ. अमोल गावंडे, संगीता मसराम व सविता पुसनाके यांच्यावर बडतर्फीची कारवाई दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती.
अशात राष्ट्रीय बालहक्क आयोगाने जिल्हा प्रशासनाला नोटीस पाठवली होती. त्यावरून प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत पार पडली होती. त्यावरून गुरुवार, ४ फेब्रुवारी रोजी भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मनवर, डॉ. भूषण मसराम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल राष्ट्रीय बालहक्क आयोगाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून यात आणखी काय घडणार, याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत.




