34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ बुद्ध विहार समन्वय व शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन- कार्यशाळा

बुद्ध विहार समन्वय व शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन- कार्यशाळा

त्यागमुर्ती रमाई जयंती दोन दिवसीय कार्यक्रम..

0
41

blank

गोंदिया,दि.06*:-त्यागमुर्ती आईसाहेब रमाई जयंती निमित्त दोन दिवसीय समाज जागृती कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या दिवशी स्थानीक मैत्रीय बुद्ध विहार भिमनगर गोंदिया येथे बुद्ध विहार समन्वय व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या प्रसंगी समता सैनिक दल, भारतिय बौध्द महासभा व विविध सामाजिक संघटनां तर्फे महामानवाना अभिवादन सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य बुद्ध विहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती यानी “बुद्ध विहार संस्कृती निर्मिती साठी आणि बौद्ध समाजात संगठीतपणा, बंधुभाव, शिस्त, शील सदाचारी वृत्ती रुजवण्यासाठी बुद्ध विहार समन्वय समितीची उपयुत्कता या विषयावर मार्गदर्शन केलं. माजी शिक्षणाधिकारी एन.एम.ठमके यानी शैक्षणिक धोरणाविषयी मार्गदर्शन केले तर टीम आता लढुया एकिनेच नागपुर चे अतुल खोब्रागडे यानी “विद्यार्थ्यांपूढिल आव्हान व त्याचे समाधान” या विषयावर मार्गदर्शन केले. समता सैनिक दलाच्या कमांडर किरण वासनिक, भारतिय बौद्ध महासभेचे संध्या बन्सोड, महिला सशक्तीकरण संघाच्या सविता उके, विमलताई मेश्राम, उमाताई गजभिये यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आयोजित सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता सैनिक दल प्रचारक महेंद्र कठाने, संचालन मैत्रीय बुद्ध विहार तर्फे लक्ष्मी राऊत व उपस्थितांचे आभार संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे यानी केले.

blank