33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ चंद्रपूरात जनविकास सेनेने केली कृषी कायद्याची होळी, ब्रम्हपुरी येथील शिवाजी चौकात रास्ता...

चंद्रपूरात जनविकास सेनेने केली कृषी कायद्याची होळी, ब्रम्हपुरी येथील शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन

0
30

blank

चंद्रपूर,दि.07ः- संपूर्ण देशपातळीवर शेतकऱ्यांनी दि. ६ फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन पुकारले होते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलनाच्या समर्थनार्थ कोरपना तालुक्यातील जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी कायद्यांची होळी करून आंदोलन केले.जन विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात कृषी कायद्यांची प्रतिकात्मक होळी यावेळी करण्यात आली. कोरपना-जिवती मार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या आंदोलनात सहभाग घेतला.यावेळी कृषी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी हिताच्या आडून व सुधारणेच्या नावाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व नष्ट करणे, हमीभाव पध्दत संपुष्टात आणणे तसेच मोठ्या उद्योगपतींना साठवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देवून कृत्रिम भाववाढीला चालना देणे अशी अनेक कटकारस्थाने केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात रचलेली आहेत. भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलेले नाही. मात्र मोदी सरकार मधील मंत्री व त्यांचे समर्थक चक्क अन्नदात्यालाच दहशतवादी म्हणायला लागले आहेत. शेतकऱ्यां विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या तसेच शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या सरकारचा विरोध करण्यासाठी कृषी कायद्यांची होळी करण्यात आली अशी प्रतिक्रिया जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिली.या आंदोलनामध्ये जन विकास सेनचे सचिन पिंपळशेंडे,भिकू मेश्राम,सुनील बुटले,अरविंद आत्राम,किशोर मडावी,भोजीपाटील कुळमेथे,सत्यपाल कींनाके,रवी पंधरे,दिनेश झाडे,कमलेश मेश्राम,विष्णू कुंभरे,तुषार निखाडे,आकाश लोडे,गितेश शेंडे,अक्षय येरगुडे,सचिन दडमल,वसंता कुंभरे,शंभू नैताम गिरीधर तोडासे इत्यादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

ब्रम्हपूरी-ः अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने 6 फेब्रुवारी 2021 रोजी देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली होती,त्या अनुषंगाने ब्रम्हपुरी येथे शिवाजी चौकात दुपारी बारा ते एक वाजता पर्यंत विविध पक्ष व संघटनाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करीत तहसीलदार विजय पवार यांच्या मार्फत  राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन देऊन नव्याने पारित करण्यात आलेले शेतकरी विरोधी असलेले तीन कृषी कायदे ,वीज बिल विधेयक 2020 तसेच कामगार विरोधी सहिंता रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.

blank
यावेळी आंदोलनाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष वासू सौंदर्कर,युवक नेते जगदीश पिलारे,वंचित बहुजन आघाडीचे नेते ड्रा प्रेमलाल मेश्राम, आय टक संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद राऊत,किसान सभेचे तालुकाध्यक्ष सुधीर खेवले,अश्विन उपासे,लीलाधर वंजारी,राहुल भोयर विनायक पारधी,महादेव बगमारे,विवेक नरुले,सुहास हजारे,पराग बंपुरकर,सागर हर्षे,गिरिधर गुरपुडे,दामोधर डांगे, दुधरा म आकरे,आदी विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
कॉ.विनोद झोडगे म्हणाले की नव्याने पारित करण्यात आलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे.न्याय हक्काच्या मागणीसाठी 73 दिवसा पासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करून केंद्र सरकार दडपशाही करत आहे रस्त्यावर बारिके ट, खिळे तर चक्क भिंत बांधून देशातील शेतकऱ्यांना रोखण्यासाठी एखाद्या सिमेसारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे.हे हुकुमशाही चे दर्शन सरकारने घडविले आहे.जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना ,शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी केंद्र सरकार आडमुठेपणा चे धोरण सोडण्यास तयार नाही. ड्रा. प्रेमलाल् मेश्राम यांनी अनेक शेतकऱ्यांचे बलिदान जाऊन देखील सरकारला जाग आली नसून,देशातील शेतकरी पेटून उठला आहे.जगदीश पीलारे यांनी देशातील शेतकऱ्यांन चे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा हा उद्रेक आहे.हिंसक आंदोलन होण्यामागे केंद्र सरकार ची आडमुठे पणाची भूमिका जबाबदार आहे देशाच्या पोशिंध्यावर अन्यायाचा अतिरेक झाला असून ,देशातील शेतकरी परत एकजुटीने पेटून उठला आहे आणि तो या लढ्यात जिंकल्या शिवाय राहणार नाही असे ठासून सांगितले.केंद्रातील भाजप सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत आंदोलकांनी रस्त्यावर येऊन चक्का जाम आंदोलन केले.रास्तारोको आंदोलन करणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.

blank