
भद्रावती,दि.७ :-नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकारच्या वतीने भद्रावती तालुक्यातील चरूर (घा)येथील विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ व कोकेवाडा (मा.)येथील सिद्धिविनायक बाल गणेश क्रिडा मंडळ यांना नुकतेच क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा युवा समन्वयक शमसेर सुभेदार , लेखापाल डुबे, मारोती बोबाटे, सोनाली सोनारकर, मंडळाचे अध्यक्ष महेश केदार ,सचिव अमोल दडमल , कपिल मानकर ,अंकित मानकर ,नेहरू युवा केंद्राचे भद्रावती तालुका राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आशिष हनवते उपस्थित होते.





