
गोंदिया-– येथे दि.7 फेब्रु रोजी जिल्ह्यातील वंजारी समाजबांधवांची सहविचार सभा व वंजारी कर्मचारी समितीची कार्यकारीणी वंजारी समाजाचे प्रमुख मार्गदर्शक नेते व अध्यक्ष जनता शिक्षक महासंघ,गोंदिया लक्ष्मणराव आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आली.या सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी बालाजी डिघोळे होते.तर प्रमुख अतिथी म्हणुन रवींद्र दहिफळे, शंभुदेव मुरकुटे हे होते.सहविचार सभेमध्ये प्रमुख मान्यवरांनी सांगीतले की प्रत्येक समाज बांधवाचे समाजासाठी काहीतरी देणे लागते या उद्दात्त भावनेतुन प्रत्येकाने काम करावे.समाजातील शोषीत, पिडीत,गरजुवंताना मदत करावी,असे आव्हान यावेळी समाजबांधवांना करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये समाजाची पुढील वाटचाल व दिशा ठरविण्यात आली.जिल्ह्यातील वंजारी समाजाच्या सहविचार सभेमध्ये वंजारी कर्मचारी समितीची नविन कार्यकारिणी सर्वांच्या उपस्थितीत बहुमताने गठीत करण्यात आली.या मध्ये गोंदिया जिल्हा वंजारी कर्मचारी समितीच्या अध्यक्षपदी शिवाजीराव बडे(कवी,व्याख्याते,)यांची निवड करण्यात आली. मुख्य मार्गदर्शक म्हणून लक्ष्मणराव आंधळे यांची तर उपाध्यक्ष परमेश्वर केंद्रे,सिध्देश्वर केंद्रे,सचीव शरद बोंद्रे,सहसचीव वसुदेव जायभाये,कोषाध्यक्ष रामप्रभु मुंडे,कार्याध्यक्ष मारोती मुंडे, संघटक गोवर्धन खेडकर ,सहसंघटक प्रकाश घुगे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.यांच्या निवडीबद्दल बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व समाजबांधवानी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.




