34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय सोयगाव येथील 21 पैकी 14 ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात

सोयगाव येथील 21 पैकी 14 ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात

0
38

blank

सोयगाव, दि.10-) सरपंच – उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने सोयगाव तालुक्यात निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहेत. सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदार संघात येणाऱ्या 21 ग्रामपंचायत पैकी 14 ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सरपंच – उपसरपंच विजयी झाल्याने तालुक्यात भाजपला जोरदार धक्का बसला आहे.
महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार , युवानेते अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे , शहरप्रमुख संतोष बोडखे,पं. सहसभापती उस्मान पठाण, उप सभापती साहेबराव गायकवाड, तालुका संघटक दिलीप मचे दारासिंग चव्हाण, बाबू चव्हाण, रमेश गव्हांडे, धरमसिंग चव्हाण, दिलीप देसाई, शेख बबलू आदींनी नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंचांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सोयगाव तालुक्यात भगवा फडकविलेल्या ग्रामपंचायती खालील प्रमाणे
तिखी, निमखेडी, कवली, बहुलखेडा, जंगलातांडा , पळासखेडा, वरखेडी बु. धनवट , फर्दापूर, मोलखेडा,हिवरा, जामठी,पिंपळा, रवळा,जावळा, टिटवी,पळासखेडा, पिपळवाडी, महाललब्धा , डाभा, घाणेगाव तांडा चारूमुर्ती.

blank