34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ केंद्र सरकारची ‘वॉटर हिरोज’ स्पर्धा

केंद्र सरकारची ‘वॉटर हिरोज’ स्पर्धा

0
28

भंडारा दि.10 : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने ‘वॉटर हिरोज शेअर युवर स्टोरीज’ ही स्पर्धा आयोजित केली असून पाणी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

1 सप्टेंबर 2020 पासून ही स्पर्धा सुरू झाली असून या स्पर्धेत पाणी व्यवस्थापन विषयावरील यशकथा व व्हिडीओ केंद्र सरकारच्या My Gov या पोर्टलवर अपलोड करुन या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. पाणी व्यवस्थापन विषयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दहा संस्था दर महिण्याला निवडण्यात येणार आहे. त्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी केलेल्या कामाचे व्हिडीओ तयार करुन www.mygov.in किंवा [email protected] यावर पाठवावेत. 1 ते 5 मिनिटांचा व्हिडीओ असावा व सोबत 300 शब्दांची यशकथा, समर्पक छायाचित्र जोडणे अपेक्षित आहे.

blank