
आमगाव,दि.11ः-प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत घरकुल योजने अंतर्गत घरकुलाचे बांधकाम करतांना आदर्श घरकुल कसे असावे यांचा नमुना म्हणून प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीच्या आवारात एक डेमो हाऊस म्हणून उभारण्याचे शासनाच्या निर्देशानुसार आमगाव पंचायत समितीच्या आवारात आमदार सहसराम कोरेटे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.कार्यक्रमाला गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे,बाल विकास प्रकल्प आधिकारी मानकर,संजय बहेकार,छबूताई उके,शिक्षणाधिकारी श्री मेश्राम,सहाय्यक प्रशासन अधिकारी खोब्रागडे,महेश उके,अधीक्षक काळे.विस्तार अधिकारी रहांगडाले,श्री.उके,कनिष्ठ अभियंता कु. ठाकरे, स्थापत्य अभियंता हटवार,पटले,विस्तार अधिकारी कृषी पटले, कु. तिराले, आनंद रहांगडाले,पंकज चौहान,आशिष बोळणे,सौरभ बोपचे,विपीन रहांगडाले,हरीश बारेवार ग्रामीण गृह निर्माण अभियंता, राजेश सातनूरकर व इतर गणमान्य उपस्थित होते.





