35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ एमटीडीसी पर्यटकांचे स्वागत करते केवळ फलकावर…

एमटीडीसी पर्यटकांचे स्वागत करते केवळ फलकावर…

0
58

blank

भंडारा,-महामार्गावर लागलेले दिशादर्शक फलक मार्गदर्शक ठरण्याच्या दृष्टीने लावले जातात. मात्र कधी कधी हे फलक दिशाभूल करणारेही ठरतात. आता पर्यटन विकास महामंडळाचेचं घ्या ना…. जी गोष्ट झालीच नाही त्याचा फलक लावून यंत्रणा मोकळी झाली. फलकावर दिसत असलेले पर्यटक स्वागत केंद्र प्रत्यक्षात मात्र ठिकाणावर दिसत नसल्याने महामंडळाला फलक लावण्याची घाई का हा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर लावले जाणारे फलक हे लोकांना दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरावे म्हणून केली गेलेली व्यवस्था आहे. परंतु ही व्यवस्थाचं एखाद्या यंत्रणेची पितळ उघडे करीत असेल तर फलक लावून मोठेपणा मिळवण्याची घाई का हा प्रश्न उपस्थित होतो. हा विषय येण्याचे कारण म्हणजे पर्यटन विकास महामंडळाचा राष्ट्रीय महामार्गावर कारधा येथील चौफुलीवर लागलेला फलक! या फलकावर पर्यटन विकास महामंडळाच्या विविध पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी दिशा दर्शविण्यात आली आहे.
या फलकावर पर्यटक स्वागत केंद्र खांबतलाव असे लिहून बाण भंडारा शहराच्या दिशेने दाखविला आहे. भंडारा शहरात खांब तलाव आहे हे मान्य आहे. त्याठिकाणी पर्यटन विकास महामंडळाकडून कित्येक वर्षांपासून पर्यटन विकासाचे काम सुरू असल्याचेही लोकांच्या नजरेस पडते. आता तर ाम करणार्‍या कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून पोबारा केला याचीही माहिती ऐकिवात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत खांबतलावाला कुणीच वाली नसल्यागत स्थिती आहे. झालेले सौंदर्यीकरण नाही विद्रुपीकरण च्या दिशेने चालले आहे. खांब तलावा परिसराची ही वास्तविकता असताना फलकावर मात्र पर्यटक स्वागत केंद्र खांबतलाव असे लिहून चक्क पर्यटकांची करण्याचा प्रयत्न महामंडळाने केला आहे. आज खाम तलाव परिसरात असे कोणतेही स्वागत केंद्र उभारले गेले नाही. ना कुठलाही अधिकारी कर्मचारी येथे सतत तैनात नसतो. मग फलक पाहून आलेल्या पर्यटकांचे या ठिकाणी स्वागत कोण करणार हा प्रश्नच पडतो. रस्त्यावर लागणारे फलक हे मार्गदर्शक ठरावे म्हणून लावले जातात. पण या ठिकाणी चक्क पर्यटकांना बुचकळात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता फलकावर आलेले हे पर्यटक स्वागत केलं प्रत्यक्षात कधी उतरते हे पाहणे एवढेच काम आपण करू शकतो.

blank