39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ प्रतापगड ग्रा.पं सरपंचपदी भोजराज लोगडे तर उपसरपंचपदी उमेश मडावी

प्रतापगड ग्रा.पं सरपंचपदी भोजराज लोगडे तर उपसरपंचपदी उमेश मडावी

0
38

blank

नवेगावबांध (अर्जुनी मोर.) तालुक्यातील ऐतिहासिकदृष्ट्या नावलौकिक असलेल्या तिर्थक्षेत्र प्रतापगड ग्रामपंचायत मधे भाजपा समर्पित पॅनलनी 6– 3 ने विजय मिळवून बहुमत प्राप्त केले होते. आज ता.12 ला घेण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपाचे भोजराज लोगडे सरपंच, तर उमेश मडावी उपसरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले.
अर्जुनी मोर. तालुक्यातील नऊ सदस्यीय असलेल्या प्रतापगड ग्रामपंचायत मधे भाजपा समर्पित पॅनेल नी सहा उमेदवार निवडुन आणुन निर्विवाद बहुमत मिळविले होते.तर राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित पॅनेलला केवळ तिन जागावरच समाधान मानावे लागले. आज झालेल्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपा चे भोजराम लोगडे व उपसरपंच पदांसाठी उमेश मडावी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.दोन्ही पदासाठी एक एकच अर्ज आल्याने निवडणूक अध्याशी अधिकारी कापगते यांनी भोजराम लोगडे सरपंच तर उमेश मडावी यांना उपसरपंच घोषीत केले.अत्यंत शांततेत पार पडलेल्या या निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक अध्याशी अधिकारी कापगते, ग्रामसेवक दरवडे,यांनी पार पाडली. भाजपा समर्पित पॅनेल ला घवघवीत यश संपादन करण्यासाठी तथा सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत कलाम नजीर शेख,माणिक राऊत,हयातअली सय्यद, नितीन पुस्तोळे, गोविंदा वालदे,यादोराव डोंगरवार, ज्ञानेश्वर वालदे,रमेश लोगडे, मंगेश गायकवाड, राजेंद्र सलामे यांनी विशेष परिश्रम घेतले

blank