37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ एकोडी ग्रा.पं.वर ग्रामविकास पॅनलचा ताबा,सरपंच शालु चौधरी तर उपसरपंचपदी वर्षा अंबुले

एकोडी ग्रा.पं.वर ग्रामविकास पॅनलचा ताबा,सरपंच शालु चौधरी तर उपसरपंचपदी वर्षा अंबुले

0
68

blank

एकोडी : येथील ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलने ताबा मिळविला आहे. एकूण १३ सदस्यीय असलेल्या ग्राम पंचायतीत १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी शालु चौधरी तर उपसरपंचपदी वर्षा अंबुले यांची बिनविरोध निवड झाली.
१२ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदाकरिता निवडणूक सुरू होताच सरपंच पदाकरिता सौ. संगिता अशोक रिनाईत व शालु मुन्नीलाल चौधरी तर उपसरपंच पदासाठी वर्षा अंबुले यांनी नामांकन दाखल केले. शालु चौधरी यांच्या बाजुने १३ पैकी १० सदस्य असल्याने संगिता रिनाईत यांनी नामांकन माघे घेतले. त्यामुळे सरपंच व उपसरपंचाची बिनविरोध निवड झाली. संगीता वरठी, शबनम पठान, बहिदा शेख, अजाबराव रिनाईत, राकेश बिसेन, शुभम बोदेले, जगजीवन वघारे यांनी सरपंचाच्या बाजुने सक्रीय सहभाग घेतला. तर विरोधात संगीता रिनाईत, मंजु पटले व दीपक रिनाईत होते. विशेष म्हणजे विरोधकांनी निवडणूक होण्यापूर्वीच सभागृहातून पलायन केले. अध्याशी अधिकारी म्हणून विजय कठाणे तसेच तलाठी देवेंद्र भगत यांनी काम बघितले. तर ग्रामविकास अधिकारी ओ.एम. तुरकर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

blank