39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ हिराटोला सरपंच, उपसरपंच निवडणुकीत सामाजिक न्यायाचा विजय…… कैलास डोंगरे

हिराटोला सरपंच, उपसरपंच निवडणुकीत सामाजिक न्यायाचा विजय…… कैलास डोंगरे

0
84

blank

गोरेगाव ता १४:- हिराटोला येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणुक शुक्रवारी (ता.१२) घेण्यात आली या निवडणुकीत सामाजिक न्यायाचा झेंडा फडकाविण्यात आला असे संस्थापक मनोहर भाई पटेल कूषी महाविद्यालय हिराटोला कैलास डोंगरे यांनी सांगितले आहे .
हिराटोला येथील सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आरक्षण हे सर्वसाधारण महीला सरपंच आरक्षण होते. तरीसुद्धा संस्थापक कैलास डोंगरे यांच्या कुशल नेतृत्वामुळे सरपंच म्हणून अनुसूचित जाती प्रवर्गातुन निवडुन आलेली सदस्य महीला माधवी डोंगरे यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली. तसेच उपसरपंच म्हणून अनुसूचित जमाती प्रवर्गातील सदस्य भोजराज पुसाम यांची निवड करण्यात आली.
सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असेल त्या जागेवर अनुसूचित जाती महीलांची सरपंच म्हणून निवड केली जात नाही. परंतु हिराटोला येथे अनुसूचित जाती प्रवर्गातुन निवडुन आलेली सदस्य माधवी डोंगरे यांची सरपंच म्हणून निवड झाली. व उपसरपंच म्हणून अनुसूचित जमाती प्रवर्गातील भोजराज पुसाम यांची निवड करण्यात आली ही निवड सामाजिक न्यायाचा झेंडा फडकाविणारी आहे. हिराटोला ग्रामपंचायतीवर सामाजिक न्यायाचा पाया रोवला गेला आहे. या यशाचे श्रेय इशुलाल पटले,प्रदिप डोंगरे,ममता कुर्वे यांना दिल्या जात आहे.
या सरपंच उपसरपंच निवडणुकीत सहकार्य करणाऱ्याचे आभार कैलास डोंगरे,देवराज बोरकर, पुरुषोत्तम भावे, आनंद डोंगरे, सुर्यकांत डोंगरे, दामोदर रहांगडाले, धर्मेंद्र रहांगडाले, बाबुलाल डोंगरे,धनलाल जगने,दिलीप क्षिरसागर,शिवचरण नाईक, विजय कुर्वे यांनी व्यक्त केला आहे.

blank