
गोंदिया :– शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शारदा चौक स्थित श्री तिर्थराज तेजलाल उके यांचे निवासस्थानी 13 फेब्रुवारी रोजी परिसरातील सुजाण व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नागरीकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित सर्वांनी सामाजिक कार्याला नवीन दिशा देण्यासाठी तसेच परिसरात एक सशक्त सामाजिक मंच निर्माण करण्याच्या हेतूने जनशक्ती बहुउद्देशिय सामाजिक संस्था, गोंदिया ता.जि.गोंदिया (महा.) चे गठन करण्याचा एकमताने निर्णय घेतला व या नावाखाली संस्थेचे गठनही केले. यावेळी सर्वांनी एकमताने एक वर्ष कालावधीसाठी कार्यकारिणीचे गठन केले. सभेत एकमताने कार्यकारिणीचे अध्यक्ष मयूर अनंतराम मेश्राम, उपाध्यक्ष राजेश (पिन्टु) ओमप्रकाश मेश्राम , रमेश टंटुजी सोनवाने , सचिव अनिल बलीराम शरणागत, सहसचिव आशिष बाबुलाल उईके, कोषाध्यक्ष कैलाश लक्ष्मण शेंडे, सहकोषाध्यक्ष डेईराम (छोटु) पुरनलाल ठाकरे, संगठक देवेंद्र नत्थुजी शेंडे, सूर्यभान नेतराम मेश्राम, ताकेश ब्रिजलाल पहिरे,उमेश रामाजी भांडारकर , महिला संगठक मिना सूर्यभान मेश्राम, प्रसिद्धी प्रमुख रोशन गणेश पाचे तसेच सदस्यपदी अनिल महेश पारधी ,शशांक भेदराज चौरे, राजेश भाऊलाल कटरे,अशोक दसाराम बिसेन , भुषण ज्ञानीराम गौतम, संतोष बलीराम सहारे आदींची निवड उत्साहपुर्ण वातावरणात करण्यात आली. सदर नवगठीत कार्यकारिणीच्या संयोजक पदी तिर्थराज तेजलाल उके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.





