38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जिल्हा कार्यकारिणीत विनोदकुमार माने तर तालुका कार्यकारिणीत प्रदीप राठोड यांची निवड

जिल्हा कार्यकारिणीत विनोदकुमार माने तर तालुका कार्यकारिणीत प्रदीप राठोड यांची निवड

0
113

blank

गोंदिया- महाराष्ट्र राज्य मराठी माध्यमिक शिक्षक संघाची गोंदिया जिल्हास्तरीय व तालुकास्तरावरील कार्यकारीणीचे गठण नुकतेच करण्यात आले यात गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालित जी.ई.एस.हायस्कूल व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढराबोडी येथील उपक्रमशिल शिक्षक, व महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल से.स. गोंदियाचे आर.एस.पी.अधिकारी प्रा.विनोदकुमार माने यांची महाराष्ट्र राज्य मराठी माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीत प्रसिद्धीप्रमुख पदी निवड करण्यात आली तर गोंदिया तालुका कार्यकारीणीत सहाय्यक शिक्षक प्रदीप राठोड यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.blank मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करणे, विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करणे,मराठी विषयाच्या अनुषंगाने एस.एस.सी.नागपूर मंडळास मदत करणे,विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी मराठी भाषा विषयाच्या अनुषंगाने  विविध स्पर्धेचे आयोजन करण्यासंदर्भात सदर कार्यकारीणीचे दोन वर्षासाठी गठण करण्यात आले आहे.या निवडी प्रसंगी गोंदिया जिल्हाध्यक्ष तथा  संत तुकाराम विद्यालय भोसा येथील सहायक शिक्षक घनश्याम पटले तसेच गोंदिया जिल्हा कोषाध्यक्ष तथा बोळुंदा येथील प्राचार्य कुवरलाल वैद्य यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व्यक्त केले व भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निवडी प्रसंगी विनोदकुमार माने व प्रदीप राठोड यानी राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल,मनोहर भाई पटेल अकँडमीच्या अध्यक्षा वर्षाताई पटेल,माजी आमदार तथा गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन आदींचे, जिल्हा कार्यकारिणीचे व तालुका कार्यकारीणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच विद्यालयातील प्राचार्य बी.एच.जीवानी, पर्यवेक्षक एच.ए.नागपूरे, वरिष्ठ शिक्षक यु.सी.रहांगडाले, व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

blank