
गोंदिया : विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आपल्या विविध मागण्यांना घेऊन सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सोपविण्यात आले.
विविध मागण्यांमध्ये कोरोना काळातील विद्युत बिल राज्य शासनाद्वारे भरण्यात यावे, 200 युनिटपर्यंतचे वीज बिल मोफत करण्यात यावे व त्यानंतरच्या युनिटचे वीज दर कमीत कमी करण्यात यावे, कृषी पंप बिलमुक्त करण्यात यावे व लोड शेडिंग बंद करण्यात यावे आदि मागण्यांचा समावेश आहे.
नागपूर येथील आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले, याचा निषेध करण्यात आला. तसेच याचे नाव गोंडवाना प्राणी संग्रहालय ठेवण्यात यावे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निधी तात्काळ देण्यात यावे व बांधकाम सुरू करण्यात यावे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विदर्भातील शेतकर्यांना 25 हजार रुपये प्रती हेक्टर भरपाई देण्यात यावे आणि या सर्व समस्यांचा एकाच समाधान आहे ते म्हणजे उत्तर विदर्भाचे राज्य निर्माण करण्यात यावे आदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील तिवारी, दीपा काशिवार, रजनी भाडरवार, नंदा राऊत, प्राची सिद्धमसेटीवार, कल्पना चव्हाण, राजू, बबलू लारोकर, विकास शेट्टीवार, शुभांगिनी पाथोडे यांच्यासह मोठ्या संख्येने विदर्भ राज्य आंदोलनाचे समर्थक उपस्थित होते.





