
तळेगाव (शा. पंत),-आज दिनांक 17 फरवरी रोजी अकरा वाजताच्या दरम्यान येथील मुरली मुंदाने व प्रशांत बालसकर हे दोघेही तळेगाव वरून अंतोरा येथे त्यांच्या वेल्डिंग कारखान्यांमध्ये काम करण्याकरिता जात असताना भारसवाडा ते खडकी रस्त्याच्या बाजूच्या झाडावर वीज कोसळले.
कोसळलेले झाड रस्ताहून जाणाऱ्या दुचाकी वर पडल्याने दोन जण जखमी झाले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी गावकऱ्यांच्या मदतीने ॲम्बुलन्स बोलावून पुढील उपचारासाठी आष्टी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.





