34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक “उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ मुंबई” प्रश्न मांडण्यासाठी विद्यापीठाची विशेष लिंक

“उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ मुंबई” प्रश्न मांडण्यासाठी विद्यापीठाची विशेष लिंक

0
30

blank

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील “उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ मुंबई” हा उपक्रम सोमवार, २२ फेब्रुवारी २०२१ रोजी नेहरू सेंटर सभागृह, वरळी येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.  या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे मा. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री. उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील मंत्रालय व सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत नेहरू सेंटर सभागृह, वरळी, मुंबई येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठ अधिकारी व प्राचार्य व शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या सोडवणार आहेत.

            मुंबई विद्यापीठाने  सर्व संबंधित घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या  www.mu.ac.in   या वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर “उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ मुंबई” https://dtec.mu.ac.in/application हि विशेष लिंक निर्माण केली आहे.  येथे संबंधितांना इंग्रजी  अथवा युनिकोड मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहेत. सदरील लिंक १८ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी ११. ०० वाजता सुरु होईल. निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही येथे  आहे. त्यानुसार  उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी आपली निवेदने दिनांक २० फेब्रुवारी, २०२१ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्यांना ऑनलाईन  निवेदन सादर करणे शक्य होणार नाही, त्यांनाही प्रत्यक्ष उपस्थित राहून मा. मंत्री महोदयांना आपले निवेदन सादर करता येईल.

blank