
चिचगड,दि.20ः- चिचगड अप्पर तहसिल कार्यालयांतर्गत येत असलेल्या केशोरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.भारतीताई केवळराम सलामे यांनी भारतीय जनता पार्टी सोडून काँग्रेस पक्षात आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून प्रवेश केला.यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदिप भाटीया,कविताताई वालदे सरपंच गडेगाव,बाळीराम कोटवार महासचिव काँग्रेस कमेटी,छगणलाल मुंगणकर,ब्रह्माजी अरकरा,भीमराव वालदे,धनिष अरकरा,अरविंद उके व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.





