
भंडारा दि. 20 : जिल्ह्यात आज 06 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13001 झाली असून आज 20 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13476 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.47 टक्के आहे.आज 541 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 20 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 26 हजार 416 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 13476 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 11, मोहाडी 02, तुमसर 05, पवनी 00, लाखनी 00, साकोली 02 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 13001 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 13476 झाली असून 149 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 326 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.47 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.41 टक्के एवढा आहे.
आज 3 नवीन कोरोना बाधित तर एकही कोरोनामुक्त नाही
गडचिरोली: आज जिल्हयात 3 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज एकही जण कोरोनामुक्त झालेले नाही. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9452 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9288 वर पोहचली. तसेच सद्या 59 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.26 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.62 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.नवीन 3 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 2 जणाचा समावेश आहे. तर चामोर्शी 01 जणाचा समावेश आहे. आज एकही कोरोनामुक्त झालेले नाही.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सर्वोदय वार्ड 01, सोनापूर कॉम्पलेक्स 01, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये अंबेडकर वार्ड क्र.07 येथील 01 बाधिताचा समावेश आहे.
**





