
गडचिरोली दि 22 – 21व्या राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत 18 वर्षाखालील वयोगटात सेजल किशोर गद्देवार हिने 2 सुवर्णपदक पटकाविले आहेत. यासोबतच सेजलची जयपूर येथे होणाऱ्या 21व्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली असून ही स्पर्धा 23 फरवरी ते 1 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.
13 व 14 फेब्रुवारी 2020 रोजी नागपूर येथील संत गाडगेबाबा सभागृहात 21वी राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धा 2020-21 आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण 300 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून जिल्ह्याचे तसेच शाळेचे नाव उंचावले आहे.या स्पर्धेत 18 वर्षाखालील वयोगटात सेजल किशोर गद्देवार ने 2 सुवर्णपदक पटकाविले आहेत.
कुमारी सेजल किशोर गद्देवार हिची जयपूर येथे होणाऱ्या 21व्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली असून, ही स्पर्धा 23 फरवरी ते 1 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. तिच्या यशाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. सेजलने तिच्या श्रेय मार्गदर्शक संदीप पेदापल्ली, तसेच आई-वडिल आणि आजी आजोबांना दिले आहे.





