32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ नारी सशक्तीकरणासाठी आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रशिक्षणाची गरज : शिखा पिपलेवार

नारी सशक्तीकरणासाठी आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रशिक्षणाची गरज : शिखा पिपलेवार

0
57

blank

गोंदिया : भारतात लोकशाही आहे. प्रत्येकाला विचार व्यक्त करण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण सामाजिक कार्यात ग्रामीण व शहरी भागातील महिला मागे आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर समाज व कुटुंब येतो. आजही महिलांना समोर येण्यासाठी पुरुष मंडळीकडून अडवणूक केली जाते. नारी सशक्तीकरणासाठी आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रशिक्षणाची गरज आहे. सशक्त नारी कार्यक्रमांतर्गत हे प्रशिक्षण देऊ, असे प्रतिपादन पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता शिखा पिपलेवार यांनी केले.

नारी कौशल्य, गृह उद्योगाबाबत मार्गदर्शन, सामाजिक चेतना, महिलांचे अधिकार अश्या अनेक विषयांवर माहिती, जाणीव व मार्गदर्शन कार्यक्रम गोंदियाच्या वाजपेयी वार्डातील क्षत्रीय मरठा कलार समाज मंगल कार्यालयात पार पडला. त्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

उद्घाटन डॉ. लोकेश चिर्वतकर यांच्या हस्ते, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. अतिथी म्हणून शिखा पिपलेवार, शोभा धुवारे, सिंधु पिपलेवार, नेहा धुवारे, पूजा डहाके, आरती धपाडे, अॅड. दखणे, डॉ. सोनवाने, हेमलता विजयवंशी, छाया जमईवार, सुरेश पिपलेवार उपस्थित होते.कलार समाजाचे आराध्य दैवत सहस्त्रबाहू अर्जुन यांच्या छ्याचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात मास्क व सैनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. नृत्य, गायन व हळदी-कुंकू कार्यक्रमाने सांगता झाली. संचालन साधना धुवारे यांनी केले. आभार शोभा धुवारे यांनी मानले.

50 प्रकारचे विविध स्टॉल

कार्यक्रमात महिलांचे अधिकार व कर्तव्ये, इन्कम टॅक्स रिटर्न फाइल, सायबर सिक्युरिटी, योगा व महिलांचे आरोग्य, न्यूट्रिशन्स, महिलांचे सामाजिक, आर्थिक, संस्कृतिक व राजकीय सशक्तीकरण, आशिया बूक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड, मोटीवेशनल प्रोग्राम, शैक्षणिक जागरण, महिला सुरक्षा, सूक्ष्म व लघु उद्योग, महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती, सहज योग मेडिटेशन, डिप्रेशन व इमोशनल इश्यूज, कृषी व वृक्षारोपण आदि विषयांवर 50 विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

blank