37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात संविधानिक मूल्य जनजागृती विषयावर वेबिनार

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात संविधानिक मूल्य जनजागृती विषयावर वेबिनार

0
41

blank

गोंदिया,दि.01ः- इक्वल अपॉर्च्युनिटी सेन्टर व अनु. जाती , अनु, जनजाती इतर मागास वर्ग तक्रार निवारण समिती, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय , गोंदिया आणि संविधान फॉउंडेशन , नागपूर च्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय संविधानिक मूल्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन  २८ फेब्रुवारी २०२१ रोजी वेबिनार द्वारे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटक डाँ. अंजन नायडू, प्राचार्य धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, मुख्य मार्गदर्शक माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे,डाँ.महेंद्रकुमार मेश्राम , कार्यवाहक संविधान फॉउंडेशन, डाँ. दिलीप चौधरी समन्वयक , आय . क्यू. ए. सी ., आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चौहान यांच्या उपस्थितीत या वेबिनारचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. आपल्या उद्घाटकीय भाषणात डाँ. अंजन नायडू यांनी संविधानिक मूल्य प्रत्येक भारतीयांसाठी किती महत्वाची आहेत , तसेच देशची अखंडता व एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे असणारे योगदान अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाँ. दिलीप चौधरी यांनी सादर केले. आपल्या प्रास्ताविकात डाँ . दिलीप चौधरी यांनी महाविद्यालयात जाती धर्माच्या आधारावर कुठेही भेदभाव होत नाही . तसेच संविधानिक मूल्यांची जनजागृती व हि मूल्य विद्यार्थी, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी माही कटिबद्ध आहोत हे सांगितले. तसेच महाविद्यालयात सर्वांना सामान संधी मिळावी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या इक्वल अपॉर्च्युनिटी सेन्टर ची माहिती सर्वांना दिली.
संविधान फॉउंडेशन , नागपूर चे कार्यवाहक डाँ . महेंद्रकुमार मेश्राम यांनी उपस्थितांना संविधान फॉउंडेशन चे उद्देश व उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा. ई . झेड . खोब्रागडे यांनी संविधानिक मूल्य जोपासणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे, आणि या संविधानिक मूल्यांचा जागर धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय , गोंदिया महाविध्यालयिन विद्यार्थ्यांसाठी करत आहे या बद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले. आपल्या मार्गदर्शन सत्रात त्यांनीं संविधानिक मूल्य -समता , स्वतंत्रता , बंधुता आणि न्याय या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. भारतीय राज्यघटना देशातील सर्व नागरिकास सामाजिक आणि आर्थिक न्यायाची संधी देण्यास व्यवस्थेला कटिबद्ध करते. सामाजिक प्रतिनिधित्व मिडविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीस सामान संधी मिळणे गरजेचे आहे. आणि हि सामान संधी प्रयेकाला मिडण्या साठीच सामाजिक न्यायाच्या रूपानेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास व्यक्ती समूहा साठी संवैधानिक आरक्षण आहे हे सांगितले. भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीस विचार , अभिव्यक्ती , विस्वास , श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य देते तसेच प्रत्येक व्यक्तीस तो कोणत्याही धर्माचा व जातीचा असो त्याला दर्जाची व संधीची समानता व व्यक्तीची प्रतिष्ठा प्राप्त करून देते.
या कार्यक्रमाचे संयोजक , इक्वल अपॉर्च्युनिटी सेन्टर व अनु. जाती , अनु, जनजाती इतर मागास वर्ग तक्रार निवारण समिती चे समन्वयक प्रा. धर्मवीर चौहान यांनी इक्वल अपॉर्च्युनिटी सेन्टर व अनु. जाती , अनु, जनजाती इतर मागास वर्ग तक्रार निवारण समिती चे उद्धेश व उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक यांचा परिचय व आभार प्रदर्शन केले. या जनजागृती कार्यक्रम मद्धे २०० विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाँ . अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात प्रा. संजय तिमांडे , डाँ . दिलीप चौधरी , डाँ . आनंद मोरे , डाँ . किशोर हातझाडे व कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चौहान आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

blank