गोरेगाव-स्थानिक जगत कला,वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.निलकंठ लंजे तर प्रमुख वक्ता म्हणून भवभूती महाविद्यालय आमगावचे भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डाॅ. आनंद देशपांडे व प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य डाॅ. एस. एस.भैरम, रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डाॅ.एस.टी.नंदेश्वर प्रामुख्याने विचारमंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महान वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांच्या प्रतीमेसमोर दीपप्रज्वलनाने करण्यात आली.विज्ञान दिवसाचे औचित्य साधून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा इतिहास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
डाॅ. आनंद देशपांडे यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा इतिहास व उत्तोरोत्तर झालेली प्रगती व राष्ट्रसाठी महत्वपूर्ण योगदान कसे आहे ? या विषयावर मौलिक विचार प्रकट केले . अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डाॅ. निलकंठ लंजे यांनी ” आपल्या विचारांना जोपर्यंत वैज्ञानिक विचारांची जोड देणार नाही तोपर्यंत आपली प्रगती शक्यच नाही कारण मानव व विज्ञान यांचे अतूट नाते असून आजचे युग हे विज्ञानावर अवलंबून आहे” अशाप्रकारचे मौलिक विचार प्रकट केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डाॅ .एस.टी.नंदेश्वर यांनी केले तर मान्यवरांचे आभार डाॅ. व्ही. यू. रहांगडाले यांनी मानले.





