
गोंदिया–जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या संबंधित विविध विषय आणि योजनांना घेऊन जिल्हा परिषद गोंदिया कार्यालयात आज खासदार सुनील मेंढे यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेताना खासदारांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, सर्व खंडविकास अधिकारी आणि प्रमुख अधिकार्यांची उपस्थिती हे बैठक घेण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्याला असलेली उद्दिष्ट आणि त्या तुलनेत झालेली लक्ष पूर्ती याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. ज्यांच्याकडे घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही त्यांच्यासंदर्भात करावयाचे उपाय योजना, घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास रेती देण्यासंदर्भात चर्चा यावेळी केली गेली. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकाधिक लोकांना काम देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना खासदारांनी केल्या. ग्रामीण भागात गुरांच्या गोठ्याचे असलेले उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी निर्देशही यावेळी करण्यात आले. 14 आणि 15 व्या वित्त आयोगाच्या कामांचे नियोजन वेळेत करावे आणि सर्व कामे पूर्ण होतील या दृष्टीने यंत्रणेला कामाला लावावे अशा सूचना करण्यात आल्या. आरोग्य विभागाच्या संदर्भात या बैठकीत खासदार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडून आढावा घेतला.
बैठकीला माजी आमदार रमेश कुथे, भाजपा जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.





