38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय पोहरा येथे काँग्रेस पक्षाची बैठक

पोहरा येथे काँग्रेस पक्षाची बैठक

0
55

blank

लाखनी:पोहरा येथे काँग्रेस पक्षाची बैठक ज्येष्ठ काँग्रेस नेते, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ऍड.शफीभाई लद्धानी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. भंडारा जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघाये, भंडारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजूभाऊ हटनागर, माजी जि. प. सदस्य अनिताताई फटे, रामुदा अंबादे, माजी सरपंच जिजाताई तुमडाम, माजी उपसरपंच जितेंद्र दोनोडे , माजी सरपंच देविदास गिर्हेपुंजे , माजी ग्राम.प.सदस्य प्रकाश दुर्गे , माजी ग्राम.प.सदस्य मुस्ताक छव्वारे , सादिक छव्वारे काँग्रेस नेते, विवेक गिर्हेपुंजे, ग्रा. प. सदस्य दत्रातय हटनागर प्रामुख्याने उपस्थित होते.

येणाऱ्या काळामध्ये होऊ घातलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि गावपातळीवरील संघटनात्मक बांधणीच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली तसेच युवक काँग्रेसची ग्रामशाखा तयार करण्यात आली आणि त्याच बरोबर या बैठकीमध्ये भाजपमधून केशव बोडणकर, माजी ग्रा.प.सदस्य, पुरुषोत्तम तिवाडे, नितीन भोंगाडे, योगराज गायधने, शिवनाथ ठाकरे, आशिष ठाकरे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
याप्रसंगी एड. शफीभाई लद्धानी उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी भंडारा , प्रशांतभाऊ वाघाये जिल्हाध्यक्ष सोशल मिडिया कमेटी भंडारा साहेब यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा देऊन नवागतांचा पक्ष प्रवेश घेण्यात आला. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच पक्ष आपल्या पाठीशी असुन आपल्या क्षेत्राचा विकास करण्यात सर्वांचे योगदान राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

बैठकीला काँग्रेस कार्यकर्ते गणेश बोडणकर, अभिजित फटे, योगेश गायधने, हेमंत बडवाईक, नरेश मते, राहूल फटे, युवराज सलामे, अंकुश मोटघरे, प्रविण अंबादे, सुशिल गभने, राजू बोरकुटे, शुभम कुंभलकर, राजा पठाण, दीनदयाल भुरे, वैशाली मते, ,सुजाता डोंगरे, करुणा रामटेके,राजेश मोटघरे, सुरेंद्र मोटघरे, प्रमोद नेवारे, सौरभ गिरेपुंजे, अनिल बोडनकर, केवळराम सलामे, राजेश बोरकुटे, धनराज बड़ोले, नरेश मते, सुधीर मेश्राम, जनार्दन गभने, महेंद्र मोटघरे, योगराज गायधने, शिवनाथ ठाकरे, आशिष ठाकरे, विद्यारतन शिवनकर, तुकाराम बोडनकर, दशरथ शेळके, सोहेल छवारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

blank