42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय इंधन दरवाढीच्या विरोधात महिला काँग्रेसने केली मोदींची आरती

इंधन दरवाढीच्या विरोधात महिला काँग्रेसने केली मोदींची आरती

0
60

blank

अर्जुनी मोरगाव,दि.02ः- महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार आज मंगळवारला सायकांळी ४ वाजता अर्जुनी मोरगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल दरवाढीच्या विरोधात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची उपहासात्मक घंटानाद आरती करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महासचिव शिला पटले,कांता पाऊलझगडे जिल्हा उपाध्यक्ष,शिला उइके तालुका अध्यक्ष, वनिता नाईक तालुका महासचिव,प्रज्ञा गणवीर,जयश्री खोब्रागडे,कुंदा सांगोडे,माधुरी माकोडे, नलिनी सहारे आदी महिला काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.

blank