30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ संत गजानन महाराज प्रगटदिनोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

संत गजानन महाराज प्रगटदिनोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

0
44

blank

गोंदिया, दि.3 : संत गजानन महाराज स्मारक संस्था गोंदियातर्फे प्रगटदिनोत्सवनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी उद्या गुरुवार, 04 मार्चपासून डब्लींग ग्राऊंड, सिव्हिल लाईन येथे कार्यक्रम होणार आहेत.

प्रगटदिनोत्सवाच्या निमित्ताने गुरुवार, 4 मार्चपासून दररोज सकाळी 9 वाजता श्रींचा अभिषेक व आरती होईल. तसेच सायंकाळी 4.30 वाजता पालखी व उपासना कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार, 5 मार्च रोजी प्रगटदिनाच्या कार्यक्रमानिमित्त सकाळी 9 वाजता अभिषेक, सत्यनारायण पूजा व आरती तसेच सायंकाळी 4.30 वाजता पुष्पलता सहस्त्रबुद्धे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे. शनिवार, 6 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वाजता पुष्पलता सहस्त्रबुद्धे यांचे सुश्राव्य कीर्तन व रविवारी, 7 मार्च रोजी दासनवमीनिमित्त सकाळी 9 वाजता श्रींचा अभिषेक व आरती होईल. तसेच सायंकाळी 4.30 वाजता भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाप्रसाद व गोपालकाला प्रसाद वितरण कार्यक्रम स्थगीत करण्यात आला आहे. तसेच भाविकांना मंदिरात मास्क घालून प्रवेश करावा, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे, सॅनिटायझर वापर करावा किंवा साबणाने हात स्वच्छ धुवावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज प्रगट दिनोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

blank