
गोंदिया,दि.04ः- तालुक्यातील जुनेवानी हे गाव एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील आदिवासी बहुल शेतकरी, शेतमजूर जंगलाच्या आत मध्ये वसलेले हे गाव आहे.येथील गावकऱ्यांच्या समस्या शेतीसाठी पूरक पाण्याचा अभावामुळे नागरिकांना होणाऱ्या समस्येकडे लक्ष देत माजी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कॅनल दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळाली.या 25 लाख रुपयाच्या मग्रारोहयोंतर्गत होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी या परिसराची पाहणी त्यावेळी केली होती.त्या जुनेवानी भोसनाला तलाव कॅनेल दुरुस्ती कामाचे भूमिपूजन माजी शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती जिल्हा परिषद रमेश अंबुले यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी गंगाझारी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सोनुभाऊ घरडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पटले,नांदुभाऊ आंबेडारे, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सर्व नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.





