
गोंदिया,दि.05- राज्यात शेतकऱ्यांमध्ये केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात जनजागृती केली जात आहे. हा कायदा कसा शेतकरी हिताचा नाही भविष्यात याचा होणारा परिणाम यासाठी वंचितचे सर्वेसर्वा अँड प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात गावाेगावी जाऊन जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी एकमेव पक्ष वंचितच काम करत आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज 5 मार्च रोजी आंदोलन करुन कृषी कायदे रद्द करण्याची मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फेत पाठविण्यात आले.. या कायद्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीवर परिणाम होणार आहे. पुढच्या काळात यामुळे रेशन दुकानातून गरीबांना स्वस्त दरात मिळणारे अन्नधान्यांपासून वंचित राहावे लागेल अशी माहिती जिल्हा अध्यक्ष सतिश बनसोड यांनी दिली.यावेळी राजु राहुलकर,एस.डी.महाजन,सिध्दार्थ हुमने,विनोद मेश्राम,एड.राजेश बोरकर,नंदलाल मेश्राम,किरणताई फुले,एड राजकुमार बोंबार्डे,नरेंद्र बोरकर,प्रकाश डोंगरे,विनोद मेश्राम,प्रफुल लांजेवार,जिवन खोब्रागडे,विनोद नंदुरकर,वामन मेश्राम सहभागी झाले होते.





