39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता कुरखेडा- वैरागड मार्गावर ट्रक पालटला ;तीन जण जखमी

कुरखेडा- वैरागड मार्गावर ट्रक पालटला ;तीन जण जखमी

0
32

blank

कुरखेडा,दि.06ः- भरधाव वेगात असलेला ट्रक समोरून येणाऱ्या सायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला पालटला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले यातील एक जण अजूनही कॅबिनमध्ये अडकून पडला असून बातमी लिहीपर्यंत त्याला जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी चार वाजताच्या सुमारास कुरखेडा-वैरागड मार्गावर घाटी गावाजवळ घडला .

रायपूर येथून लोखंडी पाईप घेऊन हैद्राबाद कडे जाणाऱ्या ट्रकचा घाटी जवळ एका सायकलस्वारास वाचविताना अपघात झाला यामध्ये सायकलस्वाराचे दैव बलवत्तर म्हणून बचावले. यामध्ये सायकल ट्रकखाली दबल्या गेली तर ट्रक रस्त्याच्या कडेला पालटला. यात ट्रकचा वाहक व क्लीनर कॅबिनमध्ये अडकून पडले. जेसीबीच्या मदतीने जखमींना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

blank