35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ आणखी दोन घरांना ठोकले सील

आणखी दोन घरांना ठोकले सील

0
109

blank

गोंदिया- आर्थिक वर्ष सरायला आता २८ दिवसाचा कालावधी उरला असून, यामुळे करवसुली पथक पुन्हा अँक्टिव्ह झाले असून, मंगळवारी (दि.२) थकबाकी न भरणार्‍या दोन घरांना सील ठोकण्यात आले आहे. शिवाय चार मालमत्ताधारकांना एक दिवसाचे अधिपत्र बजावण्यात आले आहे.
करवसुलीसाठी आता पथकाकडे २८ दिवसाचा कालावधी असून, या कालावधीत जेवढी जास्त वसुली होणार तेवढाच त्रास पुढील वर्षी कमी होणार, यंदा एक नवे कीर्तीमान कर विभाग करणार आहे. यामुळेच मंगळवारी (दि.२) करवसुली पथक पुन्हा मैदानात अतरले व त्यांनी शहरातील सुखदेव वॉर्ड क्रमांक-२२ मधील शेवंता बडोले यांच्या घरी धडक दिली. त्यांच्यावर सन २0१२-१३ पासून ५१ हजार ३0१ रुपयाची दोन्ही घरांची थकबाकी असूनही त्यांनी थकबाकी भरण्यास नकार दिला. यावर पथकाने त्यांच्या दोन्ही घरांना सील ठोकले.
तर त्यानंतर कुलशुनाबी अहमद शेख यांच्यावर सन २00३ पासून ८४ हजार ९७७ हजार रुपये, हिराबेन, चावडा यांच्यावर सन २00३-0४ पासून एक लाख ३९ हजार ११७ रुपयाची थकबाकी, गेंदाबाई ठाकूर, झामसिंग क्षेत्रीय व झामसिंग ठाकूर यांच्यावर सन २0१३ पासून ९४ हजार १0३ रुपयाची थकबाकी तर रतनदास कोडवानी यांच्यावर सन २0१२-१३ पासून ४३ हजार ३२१ रूपयाची थकबाकी असलयाने त्यांना एक दिवसाचे अधिपत्र बजावण्यात आले आहे.

blank