35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय अल्पसंख्याक समाजातील प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील- नाना पटोले

अल्पसंख्याक समाजातील प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील- नाना पटोले

0
86

blank

मुंबई, दि.6- सर्वांना सोबत घेवून काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न केला जाईल. अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून प्राधान्याने सोडवले जातील अशी गवाही काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
5 मार्च रोजी गांधी भवन मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य उपाध्यक्ष एम. एम. शेख यांनी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाची राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख प्रदेश पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे चेअरमन नदीम जावेद यांच्या प्रमुख उपस्थितीत बोलावली होती. यावेळी राज्यातील कानाकोपऱ्यातून जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व प्रदेश पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की आगामी काळामध्ये राज्यामध्ये काँग्रेस एक नंबर वर आणण्याचे स्वप्न सर्व वर्गातील आणि तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पूर्ण केले जाईल. अल्पसंख्यांकांच्या समस्या आणि प्रश्न पक्षाच्या माध्यमातून शासनाच्या वतीने सोडवण्यात येतील अल्पसंख्याकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी सर्व ते परी प्रयास करण्यात येतील. शिक्षणाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न आणि इतर अनेक समस्या शासनाच्या माध्यमातून प्राधान्याने सोडवण्यात येतील. असे त्यांनी सांगितले. यावेळी नदीम जावेद म्हणाले की पक्षाच्या माध्यमातून जनकल्याण योजनेचे लाभ सर्व अल्पसंख्यांक‌ वर्गापर्यंत कसोशीने पोहोचवण्याचे काम केले जाईल, अत्यंत अडचणीच्या काळामध्ये एम. एम. शेख यांनी पक्षाची धुरा अत्यंत समर्थपणे यशस्वीरित्या सांभाळली. त्यांचे कार्य पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आदर्श दायी असून पक्ष कार्यकर्त्यांनी आगामी काळामध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी आपले सर्वतोपरी योगदान द्यावे. यावेळी राज्य काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष तसेच अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष एम. एम. शेख यांनी पक्ष संघटनेविषयी विस्तृत माहिती दिली , राज्यामध्ये पक्षाचा अल्पसंख्यांक विभाग हा अत्यंत सक्रियपणे पक्षाचे कार्य करत असून आणि पक्षाचे प्रत्येक आंदोलने अत्यंत उत्साहाने पार पाडत , आज अल्पावधित केवळ एका संदेशाच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित झाले. या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा मला अभिमान असून त्यांचा आणि अल्पसंख्यांक यांचा प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी मी पक्षाच्या माध्यमातून कटिबद्ध आहे, बांधील आहे. राज्यातील अल्पसंख्याकांसाठी रोजगार, शिक्षण , मूलभूत गरजा हे महत्त्वाचे प्रश्‍न असून त्याचप्रमाणे मुस्लिम आरक्षण यांची सोडवणूक यांच्यासाठी सर्वतोपरी शासन दरबारी केले जातील आणि राज्यांमध्ये अल्पसंख्यांक विभागाचे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहे. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, काँग्रेस उपाध्यक्षा चारुलता ताई टोकस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष हाजी इब्राहिम भाईजान, आमदार मिर्झा वजाहत बेग, आमदार हुस्नबानू खलिफे, आकाश छाजेड मुंबई काँग्रेस अध्यक्ष बब्बू खान, मुंबई काँग्रेस प्रवक्ता निजामुद्दीन रईन, मूफ्ती सुफियान ,कोल्हापूरचे माजी आमदार एन. डी. पाटील ,, कोकण विभागाचे अध्यक्ष अनिस भाई कुरेशी, पुणे झोनचे अध्यक्ष नदीम मुजावर, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष हामद चाऊस, नागपूर विभागाचेचे अध्यक्ष ओवेज कादरी, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश प्रवक्ता इक्बाल सिद्दिकी, ठाण्याचे माजी आमदार तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष आणि अल्पसंख्यांक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

blank