केंद्रप्रमुख माधवी राऊत यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ

0
201

गोंदिया/एकोडी- जि. प. भारतीय विद्यालय एकोडी येथे कोविड -19 च्या सर्व नियमांचे पालन करून माधवीताई नरेशजी राऊत (केंद्र प्रमुख दांडेगाव) यांचा सेवानिवृत्तिपर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशभाऊ अंबुले (माजी सभापती शिक्षण व आरोग्य जि. प. गोंदिया), प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशभाऊ पटले (माजी प. स. सदस्य गोंदिया), राजकुमारजी हिवारे (शिक्षणाधिकारी (प्राथ )जि. प. गोंदिया) शालूताई चौधरी (सरपंच एकौड़ी), रवीकुमार पटले (माजी सरपंच एकोडी) राकेशजी बाळने (अध्यक्ष शा. व्य. स. जि. प. भारतीय विद्यालय एकोडी), धर्मेंद्रजी कनोजे (अध्यक्ष शा. व्य. स. जि. प. प्राथ. शाळा एकोडी) तसेच केंद्र दांडेगाव येथील सर्व शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हेमंत पटले सरांनी कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती माधवीताई राऊत यांचा जीवन परिचय करून दिला.एन. टी. रहांगडाले सर व मंजूताई उईके यांनी मनोगत व्यक्त करताना सत्कारमुर्ती राऊत मॅडमच्या शिस्तबद्ध कामकाजशैली, मितभाषी, कामासाठी सदैव तत्पर असण्याबाबतचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती केंद्रप्रमुख सौ.माधवीताई राऊत व त्यांचे सहचारी नरेशजी राऊत यांचे शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन उपस्थित सर्व पाहुण्या हस्ते केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. गुरुकुल कॉन्व्हेंट दांडेगाव व आश्रम शाळा दांडेगावच्या वतीनेही केंद्रप्रमुख सौ. माधवीताई राऊत व नरेश राऊत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सत्कारमुर्ती माधवी राऊत यानी गहिवरून आपल्या कार्यकाळा दरम्यान सहकार्य लाभल्यास्तव भावपूर्ण शब्दात सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंतजी पटले यानी केले तर सी. डी. हरिणखेडे सरानी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार मानले.

राजकुमारजी हिवारे यांनी लाकडाउन काळातील हृदयस्पर्शी घटना सांगून शैक्षणिक कार्य निरंतर सुरु ठेवा असा संदेश देऊन प्रामाणिक, कार्यतत्पर, स्पष्टवक्त्या, या कठीण प्रसंगी महत्त्वाच्या शिलेदारांना सेवानिवृत्त करीत असतांना मन दुःखी होत आहे असे सांगित केंद्रप्रमुख मॅडमला पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रकाशभाऊ पटले माजी प. सं. सदस्य गोंदिया यांनी कार्य तत्पर प्रशासकीय अधिकारी च लोकप्रतिनिधीचे काम जनतेपर्यंत उत्तम रित्या पोहचवीत असतो. तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवित असताना केंद्रप्रमुख राऊत मॅडम नी केलेल्या कार्याचा गौरव केला.
शालूताई चौधरी यांनी शिक्षणाची जिद्द कायम ठेवीत इतरांनाही पुढे यशस्वी वाटचाल करण्यास प्रेरित करणाऱ्या केंद्रप्रमुख सौ. माधवीताई राऊत  यांना निरोगी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
रवीकुमार पटले माजी सरपंच एकोडी यांनी शिक्षणाचा व्यापार सुरु असताना केंद्रप्रमुख सौ. माधवीताई राऊत यांनी जि. प. शाळेला मिळवून दिलेला मानाचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती सौ. माधवीताई नरेशजी राऊत केंद्रप्रमुख दांडेगाव यांनी प्रशासन चालवत असतांना वेळप्रसंगी कठोर असावे लागते पण आपण सर्व एक परिवार आहोत आणि ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरु ठेवण्यासाठी प्रेरणा दिली.
रमेशभाऊ अंबुले माजी शिक्षण व आरोग्य सभापती यांनी कोविड -19 चा संसर्ग होऊ नये म्हणून शाळा बंद आहेत. पण या कठीण प्रसंगी सर्वांना शिक्षकांचे महत्व समजले आहे. तेव्हा सर्व शिक्षकांनी स्वतःचे कार्य सुरु ठेवतात आणि त्यांना सदैव केंद्रप्रमुख सौ. माधवीताई राऊत प्रेरणा देत होत्या या शब्दात त्यांचे कौतुक केले. पुढील आयुष्यात पी. एच. डी. करण्याच्या मॅडमच्या इच्छेचे कौतुक करीत सर्वानी शिक्षण असेच सुरु ठेवावे असे सांगितले.