41.3 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home शैक्षणिक तालुकास्तरीय केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची आढावा सभा

तालुकास्तरीय केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची आढावा सभा

0
48

blank

देवरी: छत्रपती शिवाजी हायस्कुल देवरी येथे चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता दिनांक 23 जून 2025 पासून शाळा सुरु होत असल्याने पूर्व तयारीचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुचना केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना देण्यात आल्यात तसेच शासनाच्या विविध योजनाची माहिती देण्यात आली.
सभेला अध्यक्ष म्हणून सभापती अनिल बिसेन उपस्थित होते.तसेच गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे,विस्तार अधिकारी राऊत,गट समन्वयक कावळे उपस्थित होते.शासनाच्या विविध योजना बाबद सविस्तर माहिती गटशिक्षणाधिकारी मोटघरे यांनी दिली. शालेय पोषण आहार योजनेबाबद माहिती श्री राऊत यांनी दिली.नवभारत साक्षरता कार्यक्रम बाबद माहिती श्री भरणे यांनी दिली व Udise बाबद माहिती संजय मेश्राम यांनी दिली.कार्यक्रमाचे संचालन यज्ञराज रामटेके सहा. शिक्षक यांनी केले तर आभार लाडे केंद्र प्रमुख यांनी मानले.सभा यशस्वीतेकरिता उमेश भरणे, रमेश पटले, शंकर वलथरे, प्रमोद शिंगनजुळे, राकेश शहारे यांचे सहकार्य लाभले.