महीला पोलीस उपनिरीक्षक उषा खोसेंचे सर्वत्र कौतुक,गृहमंत्र्यांनीही व्टिटकरुन केले कौतुक

0
137

सातारा,दि.07ः- अपयश आले तरी खचून जाऊ नका जिद्द चिकाटी ठेवल्यास यश नक्की मिळते.सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या PSI उषा खोसे यांचा प्रवास अतिशय जिद्दी आहे. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यात आरफळ या गावी झाला.लहानपणापासून काही तरी करुन दाखवणार.याच स्वप्नातून त्यांनी सुरवात केली व शिवथर येथे प्राथमिक शाळेचे शिक्षण पूर्ण केले. महाराजा सयाजीराव येथे आपली पदवी पूर्ण करुन.आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार केला.पहील्याच प्रयत्नात यश देखील मिळाले.खाकी वर्दीची आस लागलेल्या PSI उषा यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न 2013 साली पूर्ण झाले.अधिकारी झाल्यावर त्यांनी ठरवले आपला पहीला पाठिंबा अन्यायग्रस्तांना असेल.अखेर 2015 साली आपले प्रशिक्षण पूर्ण करुन.2016 साली बोरीवली येथील पोलीस दलात पहीले पोस्टींग मिळाले.तिथे  अनेक प्रकारचे तपास कौशल्य पूर्ण केल्यामुळे आपल्या दबंग कामगिरीमुळे त्यांनी पोलीस दलात डॅशिंग अधिकारी म्हणून नाव लौकिक मिळवला.

विशेष उल्लेखनीय कार्य …

पोलीस खात्यात विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असताना महीला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न कायम हाताळण्यात आला व समुपदेशनामुळे व गुन्हा दाखल होताच त्याची उकल करण्याची हातोठी मोठी आहे.

मिसिंग अधिकारी म्हणून लेडी सिंघम नावारुपास ..

मालवणी पोलीस स्टेशनला कार्यरत असताना 15 मिसिंग पैकी 13 चा शोध घेण्यात यश मिळवले.रागाने घरातून निघून गेलेल्या अथवा अपहरण झालेल्या मुलांचा काही काळातच अगदी शिताफीने शोध घेऊन या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्याची मुंबई पोलीस दलातील मिसिंग पथकाची कामगिरी अत्यंत प्रशंसनीय आहे. विशेष म्हणजे, मिसिंग पथकातील उपनिरीक्षक उषा खोसे, अंमलदार वैष्णवी कोळंबकर आणि अंमलदार संजना परब यांनी गेल्या काही वर्षांत शेकडो मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकवला आहे.

अशा या जिगरबाज व धाडसी महीला पोलीस उपनिरीक्ष  उषा खोसे यांना भावी वाटचालीस शूभेच्छा ….

संकलन,श्री.उदय आठल्ये ,पोलीस मित्र सातारा,संपर्क -9975163547