36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Featured News डेक्कन चा ” सुभद्रा कट्टा ” सण 1988 पासून आज ही फुलवतो...

डेक्कन चा ” सुभद्रा कट्टा ” सण 1988 पासून आज ही फुलवतो मैत्रीचे धागे

0
18

blank

पुणे- सुख दुःखात एकत्र येतं मन मोकळी होतात, उमेदीतल्या हुल्लड पणाच्या आठवणी आज ही ताज्या तवाण्या होतात. कांचनदादा इथं हरवून जातो आम्ही. आयुष्याच्या वळणावर अनेक अनुभव पचवलं आज कुटूंबातील आधार देणारी सावली सारखी माणसं निघून गेली एकच ठिकाण उरलं जालिंदर भाऊ अन  आमचं  हे ” सुभद्रा कट्टा ” तिथं मन मोकळं करायला असणारं मुक्त व्यासपीठ अगदी रक्ताच्या नात्या सारखं – मुरलीकाका निंबाळकर. चेअरमन भुविकास बँक. पुणे.

पुण्याच्या राजकारणातील जिल्हा हालवणारी ही माणसं आज स्थिरवल्या राजकीय वाटेवर सर्वपक्षीय संवाद साधताना एक कुटूंब असल्याची परिनीती आली – कांचनदादा निगडे देशमूख. सदस्य, एन. सी. पी. महाराष्ट्र प्रदेश.

blankहाच तो सुभद्रा कट्टा जिथं राज्याचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिड तास वेळ देत सर्व संघटक मातब्बर मित्र परिवारा सी संवाद साधला, स्वर्गीय रामकृष्ण मोरे, दिलीपराव वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील आदींनी या कट्ट्यावर हजेरी लावत संवाद साधलेत.

या मित्र परिवारातील सर्वेसर्वा पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे, भुविकास बँकेचे मा. चेअरमन मुरली काका निंबाळकर, रमेश मामा खांदवे, गणपतराव फुलवडे,निवृत्त सनदी अधिकारी शंकरराव सातव आदी मान्यवर सुख दुःखात मित्र परिवारा सह इथं संवाद साधत चहा पान करतात.

महिन्यातून किमान दोन तीन वेळा तरी हा मित्र परिवार आज ही सातत्य टिकवून आहे.आज या सुभद्रा कट्ट्यावर जाण्याचा योग आला अन इतिहासाच्या पानांना उजाळा या मान्यवरांनी दिला.तोच तो अवखळ पणा चेष्टा,मस्करी हसून खेळून अधिकार वाणितील त्यांचे संवाद किती आपुलकी देणारे वाटले.

संतोष गावंडे पाटील, मारोतराव किंद्रे, बाळ डुंबरे, संजय उभे, पांडुरंग सिगेदार, विजयराव कदम,दिलीपराव मेदगे हरिभाऊ चिकणे. संजय वाल्हेकर, राजाभाऊ कोळेकर, ऍड सुनील बनसोडे, प्रा. भाऊसाहेब भोसले, हा. भ. प. शेखर महाराज कुटे. बापूराव घाडगे, दीपकराव खोचरे पाटील. Dipk/ कांचनदादा निगडे देशमूख. आदी उपस्थित होते.

blank