
मुंबई,दि.07ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाविकास आघाडीचे प्रमुख सल्लागार शरद पवार यांचा डिनर घेताना फोटो समाज माध्यमांवर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तसे तर राजकीय नेत्यांचे बैठकांचे अथवा सभेचे फोटो नेहमीच पाहायला मिळतात. पण यावेळी पवार कसल्या राजकीय नेत्यांसोबत नसून सहकुटूंबा सोबत जेवणाचा आनंद घेताना फोटोत दिसत आहे.मात्र आमदार रोहीत पवार या फोटोत नाहीत. https://twitter.com/supriya_sule/status/1368245973936340995/photo/1
सण-उत्सवासाठी पवार कुटुंबीय एकत्र
पवार कुटुंब दिवाळी ,पाडवा सणा निमित्य नेहमी एकत्र येत असतात. तसेच रक्षाबंधनचा वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व बहिणींसोबत रक्षाबंधनासाठी एकत्र येताना आपण पाहिले. एकत्र येऊन गप्पागोष्टी आणि गाण्याची मैफलही रंगते. त्यातून कुटुंबातील सुसंवाद चांगला राहतो. तसेच या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबाला एकमेकांसोबत वेळ घालविण्याचा एक योग् मिळतो.
फोटोला फॅमिली डिनर कॅप्शन
हा फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेयर केला आहे.मात्र फोटो नेमका कुठला आहे या बाबत सुप्रिया सुळेंनी माहिती दिली नाही . फक्त फोटोला फॅमिली डिनर इतकच कॅप्शन सुप्रिया सुळेंनी दिल आहे. फोटोत अजित पवार हे शरद पवारांच्या एकदम जवळ बसलले दिसत आहेत.