38.6 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News ट्रेलरच्या खाली येऊन महिला जागीच ठार

ट्रेलरच्या खाली येऊन महिला जागीच ठार

0
256

blank

नवाटोला येथील घटना

देवरी, दि.२३- देवरीपासून हाकेच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर असलेल्या नवाटोला येथे ट्रकच्या खाली येऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली.

या अपघातात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ट्रेलरच्या खाली आल्याने सदर महिला ही चेंदामेंदा झाली होती. सेखा सुरेश पंधरे (वय ३६) वर्ष रा. गिरोला ता. सालेकसा असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर जियालाल महादेव छोटे राह. सोनारटोला असे जखमी इसमाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला जीयालाल नावाच्या इसमासोबत दुचाकी ज्युपिटर एम. एच.३५ ए.व्ही.४५८७ या गाडीवरून नवाटोलाकडून शिरपूर/बांध कडे येथे जात होते. नवाटोला येथील राष्ट्रीय महामार्ग वर असलेल्या सुखसागर हॉटेल समोर येताच ट्रक क्र. सी.जी. ०४ एन. के. ३७२६ या ट्रेलरने धडक दिल्याने गाडीवरील महिला ही ट्रेलरच्या खाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक बाजूला पडल्याने गंभीर जखमी झाला.
सदर अपघाताची माहिती देवरी पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
सदर ट्रेलर घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. पण समोर शिरपूर येथील चेक पोस्ट नाका येथे त्याला पकडण्यात आला आहे. मृत महिला ही किरायाने नवाटोला येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. जखमीला ग्रामीण रुग्णालय देवरी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आला आहे

देवरी शहर परिसरात जड वाहतुकीचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. या जड वाहतुकीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असले तरी प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने बघत नसून प्रशासनाला नागरिकांच्या जीवाशी काही देणे घेणे नाही, असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्गावर जड वाहतूक आणि रस्त्यावर कोठेही उभे राहणाऱ्या वाहनांवर प्रशासन आतातरी कार्यवाही करणार का, असा गंभीर प्रश्न नागरिकांनी राज्याच्या गृहमंत्र्याना विचारला आहे.