
आज 29 नवीन कोरोना बाधित तर 23 कोरोनामुक्त
गडचिरोली,(जिमाका)दि.07:आज जिल्हयात 29 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 23 जणांनी
कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9692 पैकी
कोरोनामुक्त झालेली संख्या 9408 वर पोहचली. तसेच सद्या 176 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे
होण्याचे प्रमाण 97.07 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.82 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.
नवीन 29 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 24, अहेरी तालुक्यातील 1, आरमोरी तालुक्यातील 2,
कुरखेडा तालुक्यातील 1, मुलचेरा तालुक्यातील 1, जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 23
रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 20, अहेरी 1, धानोरा 1, तर कुरखेडा तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे.





