सत्कार सावित्रीच्या लेकीचा, अंतर्गत देवरी येथील ५४ महिला भगिनींचा शिक्षक समितीने केला गौरव

0
64

महिला दिनानिमित्त शिक्षक समितीचा अभिनव उपक्रम

चिचगड,दि.०८ मार्च –महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया तर्फे महिला दिनानिमित्त महिला भगिणी शिक्षिकांचा सत्कार देवरी अंतर्गत येणाऱ्या विविध शाळेत स्वतः शिक्षक समितीचे उपस्थित राहून तेथील महिला शिक्षिका भगिनींचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.

स्त्री शिक्षणाचे महत्व ओळखून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, महर्षी कर्वे, छत्रपती शाहू महाराज यासह अनेक समाजसूधारकांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य देवून समाजात महिलांना सन्मान मिळवून दिला परिणामतः सर्वच (राजकारण, समाजकारण, क्रिडा, सांस्कृतिक) क्षेत्रात महिला उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. सामाजिक जाणिवेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेत शिक्षण क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला भगिनी कर्तव्य बजावून उस्फूर्तपणे मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करुन निष्ठापूर्वक समाज घडणीमध्ये कार्य करीत आहेत. पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात करित असलेल्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया तर्फे “सन्मान सावित्रीच्या लेकीचा” या उपक्रमांतर्गत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन स्त्री शक्तीचा गौरव करण्यात आला..शिक्षक समितीच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरावर स्वागत करण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालूकाध्यक्ष गजानन पाटणकर ,सरचिटणीस विनोद बहेकार, संचालक संदिप तिडके,जि.एम.बैस ,सूरेश कश्यप,बेनीराम भानारकर ,मिथुन चव्हाण, दीपक कापसे, शरद पटले ,आर.एच. वाघाडे ,लोकनाथ तितराम, प्रकाश शहारे,यू.जी.हरिणखेडे, एल.यू. तवाडे,आर.डी.बारापात्रे,बि.आर.खोब्रागडे,यू.एम.बागडे, मंगलमूर्ती सय्याम,प्रकाश गावडकर,नाजूक लंजे, तेजराम नंदेश्वर, मनीष मेश्राम , वीरेंद्र खोटेले, उत्तम टेंभुर्णीकर ,सुरेश बांबोर्डे, कृष्णा रंगारी ,भूषण जाधव ,रवी जाधव ,तेजराम नेताम,रामेश्वर काळे, शिवकुमार राऊत, मनोहर मारगाये, हिरालाल सोनवणे , पुरुषोत्तम जनबंधू, मदनलाल जनबंधू ,आर.के नंदेश्वर ,मडकाम सर ,जीवन म्हशाखेत्री ,देवीदास नाईक ,प्रकाश नंदनवार ,दिगंबर नंदनवार ,राज चौबे, श्यामलाल मडावी ,साखरवाडे सर ,अरुण सावरकर ,नेताम सर, मुरलीधर खोटेले ,गुणीलाल ठाकरे, डि.आर धमगाये, डी.डी ऊईके ,संजय राऊत ,वामन मोवाडे ,हिरालाल चौधरी ,विलास लंजे ,आर.जी. टेकाम ,अंकुश पवार, सुनील राठोड,परमानंद बागडे,नरेंद्र अमृतकर ,सुमित चौधरी, सचिन सांगळे, पी एस गायकवाड, आर टी बहेकार,टी.आर मेश्राम ,दीक्षांत धारगावे, दीपक लांजेवार यासह तालुक्यातील सर्वच शिक्षकांनी सहकार्य केले