34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय महिला दिनानिमित्त कोरोना योध्दांचा भाजपाने केला सत्कार

महिला दिनानिमित्त कोरोना योध्दांचा भाजपाने केला सत्कार

0
41

blank

औरंगाबाद, दि.9 मार्च-जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महीला मोर्चाच्या वतीने समाजातील सर्व क्षेत्रातील महीलांचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात जीव धोक्यात घालून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योध्दांचा सन्मान केला. घाटी रुग्णालयातील सफाई कर्मचारी नम्रता निकाळजे, सुरेखा तोसामन, बबीता तुसान, प्रियंका वाकळे(कलाकार), आरोग्य सेविका रेखाताई गायकवाड, महिला छबाबाई मिसाळ, गयाबाई आहेर, सोनु कांबळे, शारदा मिसाळ, घाटीतील जना मुंडे, भालेराव ताई यांचा सन्मान करण्यात आला. मनिषा भन्साळी, दिव्या पाटील यांना हिरकणी पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भाजपाचे शहराध्यक्ष संजय केनेकर, प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष अँड माधुरी अदवंत, शहराध्यक्ष अमृता पालोदकर, मनिषा भन्साळी, लता दलाल, साधना सुरडकर, मनिषा मुंडे, लता सरदार, वंदना शहा, साक्षा शेरखाने, संगिता राऊत आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन वर्षा साळुंके यांनी केले.

blank