33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज सादर करा

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज सादर करा

0
27

भंडारा,   जिल्ह्यातील अनुसुचीत जाती, इमाव, विमाप्र व विजाभज या प्रवर्गातील सन 2020-21 या सत्रात मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना सुचित करण्यात येते की, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याकरीता mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ शासनामार्फत 3 डिसेंबर 2020 पासून सुरु करण्यात आलेले आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न बघता शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज तात्काळ ऑनलाईन भरुन महाविद्यालयास सादर करावे. अर्ज करतांना अडचणी आल्यास प्रवेशित कनिष्ठ विद्यालय, महाविद्यालय यांचेशी संपर्क साधावा. तसेच संबंधीत महाविद्यालयाने त्यांचे स्तरावर प्राप्त अर्ज योग्य तपासणी करुन त्वरीत या कार्यालयाकडे ऑनलाईन सादर करावे. काही अडचणी असल्यास कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आशा कवाडे यांनी केले आहे.

blank